भजनी मालिका
← भजनांकडे परत

तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती

taise nahon amhi viththalache das | yaven anikans kakulati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥ स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला किळकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥ अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥ तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥