भजनी मालिका

भजने

जाईजण्या बळें पोरा घालिसी हुंबरी । विचकिसी दांत पुढें पडसिल फेरी ॥१॥ पाहे हरिकडे । मग हुंबरी घाली कोडें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें ॥१॥ धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास चिंतनाची सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाईन म्हणतांचि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे मनीं ॥१॥ यमधर्माचिया दंडासी चुकला । आणि पूज्यमान झाला तिहीं लोकां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जाउनी निरंजनीं तप आरंभिलें । धांवे देवा वहिलें बोभातसे ॥१॥ प्रारब्धाचा ठेवा वैष्णावांचा रावो । नारद तो हा हो आला तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाऊं पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु०॥ गोविंद गीतीं गाऊं गोविंद गीतीं गाऊं । आनंदें जाऊं पाण्या ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जाहलें अंतर्बाह्य ॥१॥ तुमचें तें द्रव्य मोजूनियां घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥ अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥ देऊनि कापड सुखें आला घरां । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाखाई जोखाई उदंड दैवतें । वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी ॥१॥ अंतकाळीं तुज सोडविना कोणी । एक्या चक्र-पाणी वांचोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जागारे गोपाळांनो रामनामीं जागा । कळीकाळा आ-कळा महादोष जाती भंगा ॥१॥ सहस्रदळ समान अनुहात ध्वनी उठी । नामाचेनि बळें पातकें रिघालीं कपाटीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जागृति स्वप्न सुषुप्ति । तिही अवस्थातें प्रकाशिती ॥१॥ जे जागृतीते जागले । तेचि स्वप्रातें चेईले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ