भजनी मालिका
← भजनांकडे परत

जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे

jaga pari nijala dise | karma kari sphuran nase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥१॥ सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ॥२॥ संकल्पविकल्पाची ख्याती । उपजेचिना सदा चित्तीं ॥३॥ यापरी जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥