भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाईन म्हणतांचि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे मनीं

jain mhanatanchi pandharapura | kalikala darara upaje manin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाईन म्हणतांचि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे मनीं ॥१॥ यमधर्माचिया दंडासी चुकला । आणि पूज्यमान झाला तिहीं लोकां ॥२॥ विधी म्हणे तया निषेधुची नाहीं । कर्माकर्मप्रवाही न पडेचि तो ॥३॥ निळा म्हणे तेणें आनंदवुनी सकळा । नेलें आपुल्या कुळा वैकुंठासी ॥४॥