भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा

jaun devachiya ganvan | dev deil visanva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥१॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार। देव सुखाचा सागर ॥२॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥ तुका म्हणे आम्हीं बाळें । या देवाचीं लडिवाळें॥४॥