भजनी मालिका

भजने

जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥ प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती । सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जयातें पाहतां परतला आगमु । निर्गमा नाकळे दुर्गमु । सिध्दांसाधक निरुतें वर्मु । न पडे ठायीं सर्वथा ॥१॥

जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥ न लगे साधन मांडणें तत्त्वता । नाम गातीं गातां सोपा सर्वां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥ अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जयासी लागली रामनामाची गोडी । त्यानें केली प्रौढी परमार्थाची ॥१॥ कलिमाजीं नाम सुलभ सोपारें । यालागीं आदर नामीं धरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥ आतां माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जरासंदुमल्लमर्दनु तो । गजपित्राहटणु तो गे बाई ॥१॥ कुब्जकपान तो । सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥ध्रु०॥

जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥ कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम