भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं

jauniyan malin nama to baisala | vyapar to kela pashanashin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥ देऊनि कापड सुखें आला घरां । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥ धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरीं कापड दिलें ॥३॥ आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनीं पहावा हस्त त्याचा ॥४॥