भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें

jain pandhari | henchi chintan dharin | mag to shrihari | nupekshi bhaktanten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें ॥१॥ धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास चिंतनाची सर्वथा ॥२॥ न धरी माझें आणि तुझें । भार घाली पारे वोझें । एका जनार्दनीं दुजें । मग नाहीं तयातें ॥३॥