भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाईल तरीं जावो प्राण । परी मी न सोडी चरण

jail tarin javo pran | pari mi na sodi charan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाईल तरीं जावो प्राण । परी मी न सोडी चरण ॥१॥ ऐसा विश्वासलों हरीं । नाम तुमचें कंठीं धरीं ॥२॥ होईल एं होवो साचा । परी न संडो नाम वाचा ॥३॥ चित्त वेधलें चिंतनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥