जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव
jane antarincha bhav | tochi karito upav
जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥ न लगें सांगावें मांगावें । जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥
jane antarincha bhav | tochi karito upav
जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥ न लगें सांगावें मांगावें । जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥
jane tyachen varma nene tyachen karma | kelyavin dharma nenavati
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥ मैथुनाचें सुख सांगितल्या खून । अनुभवाविण कळो नये ॥२॥
jane palun lala | adi avasan sohala
जाणे पाळूं लळा । आदि अवसान सोहळा ॥१॥ आपुलिया बाळकातें । मोहें प्रतिपाळी त्यांतें ॥२॥
jane palun lala | mata snehatur bala
जाणे पाळूं लळा । माता स्नेहातुर बाळा ॥१॥ ऐसें जाणतसां सकळ । तरि कां लावियला वेळ ॥२॥
jane bhakticha jivhala | tochi daivacha putala
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥ आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥
jane vartaman | pari ten na vare tyachyane
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥ तो ही कारणांचा दास । देव म्हणवितां पावे नास ॥ध्रु.॥
jane sakalan antarincha | bhav sacha mithya to
जाणे सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो ॥१॥ तया करी तैसाचि मान । जैसें भजन ज्यापाशीं ॥२॥
janon gelyen tanv jananen rahilen
जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें । पाहो गेलिये तंव तेंचि जालेंगे माये ।
janon jatan tumha janivachi viren | tumachya nijadhyasen manachi mure | tumachiye bhetin angachi nure | vachahi vosare stavitan tumhan
जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें । तुमच्या निजध्यासें मनचि मुरे । तुमचिये भेटीं अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां ॥१॥ ध्यानें तुमच्या जीवचि हारपे । तुम्हांसी जाणतां बुध्दीचि करपे । तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें । मिसळें चिद्रुपें चैतन्येंसी ॥२॥
janon nenon kay | chittin dharun tujhe pay
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥ आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥
janoni nenaten karin majhen man | tujhi premakhun deuniyan
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥
janonni nenate nenatya magate
जाणोंनि नेणते नेणत्या मागते । आपण पुरते नित्यपूर्ण ॥१॥
janoni nenapan angi banale
जाणोनि नेणपण अंगी बाणले । नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माय ॥१॥
janoniyan manincha het | kelen sanath majalagin
जाणोनियां मनींचा हेत । केलें सनाथ मजलागीं ॥१॥ कृपावंत संत सद्गुरु । भवार्णव तारुं मजलागी ॥२॥
janoniyan manogat | theva hat mastakin
जाणोनियां मनोगत । ठेवा हात मस्तकीं ॥१॥ करा माझें समाधान । देऊनि वचन अभयाचें ॥२॥
janoniyan manobhav | kela sarva paripurna
जाणोनियां मनोभाव । केला सर्व परिपूर्ण ॥१॥ ऐसेचि तुम्ही कृपासिंधु । दीनबंधु सर्वदां ॥२॥
janoniyan yam santoshala manin | manjul vachanin kay bole
जाणोनियां यम संतोषला मनीं । मंजुळ वचनीं काय बोले ॥१॥ केली देवें कृपा पाठविलें मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥
janoniyan veda hosi kan re gavhara | bhajen tun pamara shriviththala
जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला ॥१॥ नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥
janoni antari | talisil karakar
जाणोनी अंतरी । ताळीसील करकर ॥१॥ तुज लागली हे खोडी । पांडुरंग बहु कुडी ॥२॥
jatan pandharisi sukh vate jiva | ananden keshava bhetatanchi
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥