भजनी मालिका
← भजनांकडे परत

जागतां नीज आलें असें हातां

jagatan nij alen asen hatan

जागतां नीज आलें असें हातां । मग पाईक म्हणवितां लाज वाटे ॥ नव्हे कोणाजोगा नाईकें हाणितलें । उणेपणें आलें पाईकपणा ॥१॥ पाईक शुध्दमति स्वामिया विवेकी । वेंव्हारु लोकिकीं चाळीतु असे ॥२॥ निदसुरा होता तो जागसुदा जाला । स्वामिये आणिला आपणापाशीं ॥३॥ पाईकपणें गेलें सन्निधान जालें । स्वामी एका बोलें निवांत ठेला ॥४॥ मागावें तितुकें खुंटलें । तेथ न मगतां आपणांते जाणीतलें । बापरखुमादेविवरा विठ्ठला प्रसादें ॥ पाईक परि अभेदें उरला असें ॥५॥