भजनी मालिका
← भजनांकडे परत

जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी

jaga jagare apale mani | bhav theuni gurucharani

रचनाकार: संत बोधले · अभंग
जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी ॥ मन राखेल जनी वनी गा रामा । कृष्णा बा हरि ॥धृ॥ भले भले रे पूर्वदत्ता । केले फळ ते आले हाता । मग भेटी जाली भगवंता ॥ १॥ वासनेचा वास हा मोडी । आशा मनसा घाली दवडि । कुबुध्दीची कुलपे मोडी । काही करावे आपुले हित । दया धर्मी द्या बा चित्त । नामी न करा दुश्चित । गा बोधला म्हणे बोधली मी पणासी आचवला । हरिचरणी जाउनी विनटलो ॥