भजनी मालिका

भजने

अलक्ष्या अच्युता सख्या भक्तराया । तूंचि देवराया पांडुरंगा ॥१॥ परात्परतर पार नेणे ब्रह्मा । तूंचि निजधाम स्वयें देसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासीचि येति चोजवितां ॥१॥ ज्याचे ध्यानीं मनीं देव । राहिला राव पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अल्प आयुष्य नरदेहीं जाण । कांहीं तरी भजन करी वाचे ॥१॥ जाणार जाणार नरदेह जाणार । न चुकेक वेरझारा जन्ममृत्यु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥ जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार। गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥१॥ पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्‍या लखलखित ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥ ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥ मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ॥१॥ ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं । धांवोनियां येई दुडदुडां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें || १ | ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं। धांवोनियां देई दुडदुडां ।। २।।

रचनाकार: संत जनाबाई

अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥ दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा