भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार

avagun ton konin nahin pratishthile | magen hot ale shishtachar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥ दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥ मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥ तुका म्हणे माझा उिच्छष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥३॥