भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती

avagunanche hatin | ahe avaghi phajiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥१॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥ विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥