भजनी मालिका
← भजनांकडे परत

अळुमाळु सोयरा तळीचि धाय

alumalu soyara talichi dhay

अळुमाळु सोयरा तळीचि धाय । सत्त्वतेजें माय एकतत्त्वीं ॥१॥ तें तत्त्वसाधन मुक्तामुक्त घन । कृष्णनाम पूर्ण तेजीं माये ॥२॥ सोकरी पापपुण्या ठायीं आपा । आयुष्य मापा हरि धावें ॥३॥ ज्ञानदेव गीत सांगतसे नित्य । कृष्णकृष्ण सत्य इतुकें सार ॥४॥