भजनी मालिका

भजने

अवघियाचि ज्ञानें अवघींचि जाणें । परि एक नेणें आत्मज्ञान ॥१॥ बोल तितुके बोलचि वरी । परि न चडे पायरी प्राप्तीची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥ अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघी चित्तवृत्ति एकवटोनि जेणें । अवघा धरिला मनें पांडुरंग ॥१॥ अवघें सुख एक तयासि फावलें । अवघें सफळ झालेम जन्म त्याचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघी जयजयकारेम पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची ॥१॥ सह मंडळी सारे उठले ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥ चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥ आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघी हे पंढरी सुखाची मांदुस । माझा स्वप्रकाश रत्न हरी ॥१॥ धन्य संतजन तेथिंचे पारखी । ज्यां झाली ओळखी विठठल-नामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघी हे पंढरी सुखाची वोवरी । अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद ॥१॥ अवघा हा विठ्ठल सुखाचाचि आहे । अनुसरे तो लाहे सर्व सुख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघींच अंगे वेष्टोनि ठेलीं । हरीचिये रंगली निज सेवें ॥१॥ तेणेंचि वाटे कृतकुत्यार्थ । चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥ गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥ कां रे धरिला अबोला । माझा वांटा देईं मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम