भजनी मालिका
← भजनांकडे परत

अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं

alpa te ayushya dhan kalin | maryada he keli santajanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥ जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥ असत्याचें गृह भरलें भांडार । अवघा अनाचार शुद्धबुद्ध ॥३॥ एका जनार्दनीं म्हणोनि । येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥