भजनी मालिका
← भजनांकडे परत

अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना

alpa ayushya alpa sarva | alpa vaibhav samajena

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना ॥१॥ म्हणे सदा माझें माझें । परी न लाजे काळासी ॥२॥ त्यासी ऐसें न कळें सदा । संसाराधंदा मिथ्या हा ॥३॥ शरण एका जनार्दनीं नाठवई मनीं श्रीहरीसी ॥४॥