भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलिप्त संसारी हरिनामपाठे

alipta sansari harinamapathe

अलिप्त संसारी हरिनामपाठे । जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥१॥ हरिविण मुक्त न करि हो सर्वदां । संसारआपदा भाव तोडी ॥२॥ आशेच्या निराशीं अचेतना मारी । चेतविला हरि आप आपरूपें ॥३॥ मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदां । अभिनव भेदा भेदिलें ॥४॥