भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन

kalpaneche jalin vasana kallolin | budale bhavajalin namahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥ तयाच्या धांवण्या कोण धांवे देव । ऐसा तो उपाव नेणेचिना ॥२॥ दुःखाचे डोंगर भोगिती बापुडीं । कोण काढाकाढी करील त्यांची ॥३॥ एका जनार्दनीं संतावांचूनिया । त्या अभाग्याची दया कोण करी ॥४॥