भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पनातीत झालें मन । जैसें गगन निरभ्र

kalpanatit jhalen man | jaisen gagan nirabhra

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कल्पनातीत झालें मन । जैसें गगन निरभ्र ॥१॥ म्हणोनिां ऐक्य आलें । स्वरुपीं ठेलें निश्चळ ॥२॥ नित्यानंदे झाली तृप्ती । देखतां भूती भगवंत ॥३॥ निळा म्हणे जडलें पदीं । निरावधी विठठलीं ॥४॥