भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें

kalpiten kalpilen chitta akalilen

कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें । तन्मय घोळिलें चैतन्याचें ॥ १ ॥ सांग माये कैसें कल्पिलें कायसे । सर्व ह्रषीकेश दिसे आम्हां ॥ २ ॥ निवृत्ति समरस सर्व ह्रषीकेश । ब्रह्मींचा समरस कल्पने माजी ॥ ३ ॥