भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळवळी मन नाहीं देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे जाले

kalavali man nahin dehabhan | vateshvar sopan sonvale jale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कळवळी मन नाहीं देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे जाले ॥१॥ संत साधुजन होत कासाविसी । आले सामाधीपाशीं तांतडीनें ॥२॥ समाधीभोंवतें कुंकुमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥ वरी मृगछाला दिसताती लाल । दर्भ आणि फुलें समर्पिलीं ॥४॥ दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे । साहित्य सकळ समर्पिलें ॥५॥ निवृत्ति पांडुरंग बैसले येऊन । नमन सोपान करितसे ॥६॥