भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि

kalyan ya ashirvaden | jati dvandven nasoni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥ आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥ गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरी ॥२॥ तुका म्हणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥३॥