भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थे

karitan vichar to ha drudh sansar | bramhandikan par nulanghave samarthe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थे ॥१॥ शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥ पाठीवरी मोळी तोचि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥२॥ आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी पायां सोई मनाची ॥३॥