भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं

karitan sadhananchya koti | namahuni tya himputin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं ॥१॥ नाम वाचे आठवितां । साधनें सर्वा येती हातां ॥२॥ नामापरतां दुजा मंत्र । नाहींनाहीं धुंडितां शास्त्र ॥३॥ एका जनार्दनीं नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥४॥