भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां उसी हातां नये चेंडु गमाविला । धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला

karitan usi hatan naye chendu gamavila | dharuni kanin pathivari baisaviti mula

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करितां उसी हातां नये चेंडु गमाविला । धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥ म्हणती म्हणे कीर । नाहींतरी घेंई फेर ॥२॥ अधिके अधिक्वरि साया घेऊं येती । गमावितां चेंडु हाल अवघेचि पहाती ॥३॥ निळा म्हणोनियां लावि लक्षडोळां । देईल हातीं चेंडु हरि कृपेचा कोवळा ॥४॥