भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां कीर्तन श्रवण । अतर्मलाचें होत क्षालन

karitan kirtan shravan | atarmalachen hot kshalan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करितां कीर्तन श्रवण । अतर्मलाचें होत क्षालन ॥१॥ तुमचें कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता ॥२॥ तुमचे कीर्तनीं आनंद । गातां तारले ध्रुव प्रल्हाद ॥३॥ कीर्तनाचा गजर होतां । यम काळ पळे सर्वथा ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं देव वंदिती चरण ॥५॥