भजनी मालिका

भजने

एक ब्रहाचारी गाढवा झोबतां । हाणोनिया लाता पळाले तें ॥१॥ गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळें झालें जगामाझी ॥धृ॥.

रचनाकार: संत तुकाराम

एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाहीं ॥१॥ मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक भूवैकुंठ एक शिवपीठ । महिमा वरिष्ठ दोहींचा ॥१॥ तेथें पेरिलें नुगवे शेतीं । अस्थी विरती तेथें उदकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥ म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥१॥ नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥ वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझें पोटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक म्हणती आम्ही देवची पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी ॥१॥ एक म्हणती आम्ही देवाची पै रूपें । तुमचिया बापे न चुके जन्म ॥धृ॥

रचनाकार: संत तुकाराम

एक विठ्ठलचिंतन । आणिक दुजें नेघे मन । ऐसें घडतां साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥ हेचि एकविधा भक्ति । येणें जोडे सर्व मुक्ति । पर्वकळ विश्रांति । तेथें घेती सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक वेळ केलें रितें कलेवर । आंता दिली थार पांडुरंगा ॥१॥ पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचें तें काई सर्वभावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम