भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक म्हणती आम्ही देवची पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी

ek mhanati amhi devachi pai jhalo | aise naka bolo padal patani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक म्हणती आम्ही देवची पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी ॥१॥ एक म्हणती आम्ही देवाची पै रूपें । तुमचिया बापे न चुके जन्म ॥धृ॥ देवें उचलिली स्वमुखे मेदिनी । तुमचे गोणी नुचवलें ॥२॥ देवे मारियेलें दैत्य दानव मोठे । तुमचेनि न तुटे तृनमात्र ॥३॥ राया विठोबाचे पद जो अभिळासी । पातकाची राशी तुका म्हणे ॥४॥