भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक वाहूं तुळसीपत्र । तें देवासी प्रीय होत

ek vahun tulasipatra | ten devasi priy hot

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक वाहूं तुळसीपत्र । तें देवासी प्रीय होत ॥१॥ रखुमाईनें देव । सोडविला कृष्णराव ॥२॥ नामा म्हणे पूर्ण होती । प्राप्त राधिकेचा पती ॥३॥