भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक भूवैकुंठ एक शिवपीठ । महिमा वरिष्ठ दोहींचा

ek bhuvaikunth ek shivapith | mahima varishtha dohincha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एक भूवैकुंठ एक शिवपीठ । महिमा वरिष्ठ दोहींचा ॥१॥ तेथें पेरिलें नुगवे शेतीं । अस्थी विरती तेथें उदकीं ॥२॥ चंद्रभागा चक्रतीर्थ । भीमा समर्थ इंद्रायणी ॥३॥ निळा म्हणे तेथें हनुमंत । येथें अश्वत्थ कनकाचा ॥४॥