भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक मूर्ख नेणती । नाम हरिचें न घेती

ek murkha nenati | nam harichen na gheti

एक मूर्ख नेणती । नाम हरिचें न घेती । मुखें भलतेंचि जल्पती । तें पावती अध:पंथा ॥१॥ नामेंविण सुटका नाहीं । ऐसी वेदशस्त्रीं ग्वाही । जो वेद मस्तकीं पाहीं । ब्रह्मयानें वंदिला ॥२॥ नित्य नामाची माळा । जिव्हे घे तूं गळाळा । तो नर कर्मा वेगळा । ऐसें बोलती पुराणें ॥३॥ नयनीं श्रवणीं हरी । आणिक काम न करी । तो साधु भक्त निर्धारीं । हरिचा आवडता ॥४॥ ज्ञानदेवीं पाहिलें ।हरिनाम साधुनी घेतलें ।’ तें समाधिस केलें । पुष्पशयनीं आसन ॥५॥