भजनी मालिका

भजने

एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभें ॥१॥ आवडीने घाली तया लोटागण । संताचें चरण वंदी माथां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक वेळ भेटी आलों भक्तराया । स्फुरति माझ्या बाह्या क्षेमालागीं ॥१॥ ऊठ पुंडलिका परतोनियां पाहें । जीवींचें आर्त काय सांग मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एक वेळ वाचे वेद कां रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥ नाम हे नौका नाम हे नौका । जगीं तारक देखा भाविकांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन सदा ॥१॥ दोघांमांजी वसे परमात्मा एक । परि बुद्धिचा तो देख पालटची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक संवत्सर जालासे सकळां । पाहावया आला ब्रह्मदेव ॥१॥ पूर्ववत गायी गोपाळ देखिले । आश्चर्य वाटलें तेव्हं त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एक हेंअनेक, अनेक जें एक । अनुभवीं देख स्वानुभव ।। कोठुनिया जालें कैसे आकारलें । वेदी वर्णियेलें ज्ञानकांडी ।।

रचनाकार: संत रामदास

एक ह्मणती आह्मी देवचि जालों । तरी असे नका बोलों पडाल पतनीं ॥१॥ एक ह्मणती आह्मीम देवासमान । तरी घासील वदन यमराम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाहा वाटी ॥१॥ नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥ नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

एकचि अक्षर वाचेसि येतां । पुढें वाढवितां विस्तारें ॥१॥ कां हे चेष्टविली वाणी । माझी चक्रपाणी मी नेणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकचि क्षरलें एकचि देखिलें । ब्रह्म हें संचलें हरिनामें ॥१॥ एक एकाकार सर्वही आकार । राम हा साकार सर्वांघटीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकचि नाम विठोबाचें । उच्चारितां वाचे उणें काय ॥१॥ रिध्दी सिध्दी लोटांगणीं । येती धांवोनि चोजवीत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा