भजनी मालिका

भजने

एकपणेंदेव विटेवरी उभा ।चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ मानस मोहन भक्तांचे जीवन । योगियांचे ध्यान पाडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकप्णें असें सर्वाठायीं वसे । योगी ज्या ध्यातसे हृदयकमळी ॥१॥ तें रूप साजिरें पाहतां गोजिरें । मन तेथें मुरे पाहतां पाहतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥ नायके वो बाई करुं गत काई । धरू जातां पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकमेळीं जेविती वैष्णव सकळ । वाढिती गोपाळ सकळांसी ॥१॥ पांडुरंगें केला चांगोबाचा सोहळा । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका ॥१॥ पुंडलिकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकली एकटची होती ये सदनीं । तव आयीकिली मुरलीची ध्वनी ॥ गेले धांवोनियां पहावया लोचनीं । तंव गेलिये देहभाव विसरोनी ॥१॥ हरि देखतांची मदनाचा पुतळा । गेला जडोनियां बैसला तो डोळा ॥ मनीं आठवे साजणी वेळोवेळां । नेल्या शोषुनी माझीया जीवनकळा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकली रानागोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें ॥१॥ मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकलें न कंठचे याविण मज आतां । घेवोनि विचरेन सवें प्राणनाथा । जनी वलीं वो एकांति वसतां । न करि वेगळा हो युगें कल्प जातां वो ॥१॥ हातीं लागला वो युगादिचा निध । भाग्यें माझिया वे जोडियला सिध्द । करुनि उपचार पूजिन सावध । न वंचीं शरीर सेविन एकविध वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकलेंचि यावें एकलेचि जावे । जोडिलें नये सवें देखती सर्व ॥१॥ परि या मायाभ्रमें कैसा केला गुंता । न पुरती संचिता भोगितां भोगा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥ म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥ अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवाणी धणीवरी ॥१॥ आनंदें चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकविध वाचे नामयासी छंद । पैं नोहे भेद आन कांहीं ॥१॥ संसारयातना दु:खाचें डोंगर । परि देवाचा विसर नाहीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति हे ॥१॥ कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम