भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत

ek majhi mata doghenjane pita | maj tin kanta doghe sut

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥ वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझें पोटीं ॥२॥ बंधु बहिणींस लग्न तें लाविलें । विपरीत झालें सांगवेना ॥३॥ एका जनार्दनीं सांगतसे गूढ । नाहीं तरी गुढ होउनी राहे ॥४॥