भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक बैसे सिंहासनीं । कर जोडोनी एक उभा

ek baise sinhasanin | kar jodoni ek ubha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एक बैसे सिंहासनीं । कर जोडोनी एक उभा ॥१॥ एक पूजा स्वीकारित । एक करित निजांगे ॥२॥ मुळीं पाहतां दोघे एक । परि कौतुक दाखविलें ॥३॥ निळा म्हणे सेवक स्वामी । पुरुषोत्तमीं हे मिथ्या ॥४॥