भजनी मालिका

भजने

एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥ सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक नरदेह नेणोनि वायां गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले । एक ते गिळले ज्ञान गर्वे ॥१॥ एक तें साधनीं ठकिले । एक ते करूं करुं म्हणतांचि गेले । करणें राहिलेंसे तैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक ना दुसरें वो नव्हते मजपांशी । मी मज नोळखतां आप आपणासी । होति ये निर्जनी वो निराभास देसीं । नेणों कोणें आणियेलें कर्मभूमिसी ॥१॥ तैंसपासूनियां विसरलें निजसुखा । वाटे जीव माझाचि परि मज वो पारिखा । देखोनि आपपर पात्र जालें बहु दु:खा । सांगो कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक पांच तीन नावांचे शेवटीं । अठरा हिंपुटीं जयासाठी ॥१॥ सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥ खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥ मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम