भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक माझी माता दोघेजण पिता

ek majhi mata doghejan pita

एक माझी माता दोघेजण पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥ चौघे बंधु आणि दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्ही माझ्या पोटीं ॥२॥ बहिणी भावासंगें खेळूं पैं लागले । विपरीत झालें सांगूं कोणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे अघटित घडे । गुरुकृपा जोडे परब्रह्म ॥४॥