भजनी मालिका

भजने

आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥ म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आळंकापुरीस पांडुरंग गेले । समाधिस्थ केलें ज्ञानदेवा ॥१॥ उरकोनी सोहळा संगें संतमेळा । विठोबा राहिला आळंदीस ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥ अझूनी कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागीं ॥१॥ बंधु बहिणी न ये कामा । काय सांगावें तुज अधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा । तेव्हां दूर पळती ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आळस पाडी विषयकामीं । शक्ती देई तुझ्या नामीं॥१॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥ सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥१॥ निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुम्हांआम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळी करितां नामदेव । जेविती स्वयमेव सांगातें ॥१॥ सांवत्याचें उदरीं बैसे । पुंडलिका वसे दृष्टीपुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आळेनो संसारा उठा वेगें चला । जिवलग विठ्ठला मे-ठीलागीं ॥१॥ दुर्लभ मनुष्य जन्म व लभेरे मागुता । लाहो घ्या स-र्वथा पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव