भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळविती बाळें । मातेतें सुख आगळें

alaviti balen | mateten sukh agalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळविती बाळें । मातेतें सुख आगळें ॥१॥ द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥ लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥ आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥३॥ नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥४॥ तुका म्हणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥५॥