भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौनचि

alani aisen kalon alen | tyasi bhalen maunachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौनचि ॥१॥ नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥ वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥ तुका म्हणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥