भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं

alavun amhi vithobasi | nenon ankiasi ranjavun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं ॥१॥ राग कळा घात मात । स्वर संगीत मूर्छना ॥२॥ ताल ग्राम छंद बंद । गीत प्रबंध कंपित ॥३॥ निळा म्हणे प्रेमें वाणी । गर्जवूं गुणीं श्रीहरिच्या ॥४॥