भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळंकापुरीस पांडुरंग गेले । समाधिस्थ केलें ज्ञानदेवा

alankapuris pandurang gele | samadhistha kelen dnyanadeva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आळंकापुरीस पांडुरंग गेले । समाधिस्थ केलें ज्ञानदेवा ॥१॥ उरकोनी सोहळा संगें संतमेळा । विठोबा राहिला आळंदीस ॥२॥ पाहे चक्रपाणि नाम्या डोळ्यां पाणी । कंठ तो दाटुनि उगा आहे ॥३॥ पुसे रुक्मिणीकांत कां रे तूं निवांत । नाम्या शोकाक्रांत कोण्या दुःखें ॥४॥