भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही

ali karavi te kalaten balaka | bujhavaven hen kan nenan tumhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥१॥ निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुम्हांआम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥ आणीक तों आम्ही न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥३॥