भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा

alas ala anga | dhanv ghalin panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥१॥ सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥ करावीं व्यसनें । दुरी येउनि नारायणें ॥२॥ जवळील दुरी । झालों देवा धरीं करीं ॥३॥ म्हणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥४॥ तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥५॥