भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली

alavitan dhanv ghali | aisi premachi bhukeli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥ ते हे यशोदेच्या बाळा । बरवी पाहातसें डोळां ॥२॥ विटेवरी उभा नीट । केली पुंडलिकें धीट ॥३॥ स्वानंदाचें लेणें ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥