भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडीं

alas nidra sandi | ramanam mhane tondin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडीं ॥१॥ धन वित्त मान । हें तों श्वानविष्ठाक समानक ॥२॥ पुत्र पत्‍नी संसार । वायां व्यर्थचि भार ॥३॥ हें परतें सांदीं मनें । एका जनार्दनीं जिणें ॥४॥