भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे

alikara kothen sahaten kathin | apula ten pran deun pahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥ सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥ अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं झालों नाहीं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणी परी ॥३॥